Shiv Sena अन् धनुष्यबाण चिन्हावर सुप्रीम कोर्टाची अंतिम मोहोर, कुणाकडं चिन्हं,पक्ष राहणार? उद्या होणार फैसला
tv9 Special Report | सुप्रीम कोर्ट नेमकं काय करणार? शिंदेंकडे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हं राहणार? की आयोगाचा निर्णय बदलून उद्धव ठाकरेंच्या हाती पुन्हा धनुष्यबाण येणार? निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा
मुंबई, १७ सप्टेंबर २०२३ | केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे कोर्टानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यानंतर यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा धनुष्यबाणावरचा निकाल कायम राहणार की कोर्ट निर्णय बदलणार यावरूनच सध्या चर्चा सुरू असल्याचे दिसतंय. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर सुप्रीम कोर्टाची अंतिम मोहोर लागणार आहे आणि त्याचीच सुनावणी सोमवार पासून सुप्रीम कोर्टात आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं शिंदे गटाला दिलं. त्यामुळं सुप्रीम कोर्ट नेमकं काय करणार? शिंदेंकडे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हं राहणार? की आयोगाचा निर्णय बदलून उद्धव ठाकरेंच्या हाती पुन्हा धनुष्यबाण येणार? याकडे ठाकरे किंवा शिंदेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा आहेत. त्यामुळे सोमवारी नेमकं काय होणार?
17 फेब्रुवारी 2023 ही तीच तारीख आहे..ज्या दिवशी शिवसेनेचा फैसला निवडणूक आयोगानं केला आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना एकनाथ शिंदेंकडे सोपवली. पण आयोगाचा निर्णय बदलून सुप्रीम कोर्ट पुन्हा आम्हालाच पक्ष आणि चिन्हं देणार असा विश्वास उद्धव ठाकरे गटाला आहे. बघा त्यांनी काय केलं भाष्य?