शरद पवारांची शेवटची निवडणूक? ‘इतरांचं वय झालंय, बारामतीचं मलाच बघावं लागेल’, अजितदादांचा पुन्हा टोला

| Updated on: Nov 14, 2024 | 11:09 AM

अजित पवार यांच्या एका वक्तव्याने सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड चांगलेच भडकले. शरद पवारांची ही शेवटची निवडणूक असल्याचे काहीजण सांगत असल्याचे अजित पवार म्हणाले. यावरूनच सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत.

शरद पवारांची शेवटची निवडणूक या अजित पवारांच्या वक्तव्यानं सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड चांगलेच भडकले. बारामतीत एका गावात अजित पवारांनी छोटी खाणी सभा घेतली. त्यावेळी काहीजण आपल्याला भेटले लोकसभेला शरद पवारांची शेवटची निवडणूक आहे असं म्हणून सुप्रिया सुळेंकडे लक्ष दिलं. आताही शेवटची निवडणूक सांगून नातू युगेंद्र पवारकडे लक्ष देणार असल्याचे काही जण सांगत असल्याचा दावा अजित पवारांनी केला. त्यावरून सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला. मुलासारखा पुतण्यासोडून थेट नातवाकडे लक्ष देत असल्याचं अजित पवार म्हणाले. यावेळी पुन्हा शरद पवारांच्या वयाचा दाखला त्यांनी दिलाच. इतरांच्या वयाचा विचार करता बारामतीचं मलाच बघावं लागेल, अस अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या वक्तव्यावरून दोन वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात शरद पवारांनी २००४ सालचा किस्सा सांगितला. कॅन्सरच्या वेळी ६ महिने असल्याचे सांगणाऱ्या डॉक्टरला मीच तुला आधी पोहोचवणार असं शरद पवार यांनी सांगितलं.

Published on: Nov 14, 2024 11:09 AM
विधानसभेच्या प्रचारापेक्षा बॅग चेकिंगचा मुद्दा तापला, उद्धव ठाकरेंच्या प्रचारावर बंदी घाला; राणेंची आक्रमक मागणी
अजित पवारांचा पहाटेच्या शपथ विधीबद्दल आधी मोठा गौप्यस्फोट अन् नंतर यू-टर्न, म्हणाले…