‘सिंचनाच्या फाईल’मुळे कोण अडकणार? गोपिनीयतेचा भंग? दादांसह फडणवीसांवर गुन्हा दाखल होणार?
दिवंगत आर.आर.पाटलांच्या सहीमुळे सिंचनाची चौकशी सुरू झाल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलंय.
अजित पवार यांनी दिवंगत आर.आर.पाटलांवर सिंचनाच्या चौकशीवरून आरोप केलेत आणि आता शरद पवारांची राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. अजित पवारांच्या आरोपांनुसार, गृहमंत्री असताना आर.आर.पाटलांनी फाईलवर ओपन चौकशीसाठी सही केली आणि केसानं गळा कापला, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. विशेष म्हणजे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मला दाखवली, असंही अजित पवार यांनी म्हटलंय. यानंतर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी गोपिनीयतेवर बोट ठेवलंय. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी गोपिनीयतेची शपथ मोडली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करा, असं संजय राऊत म्हणाले तर ७० कोटींचा घोटाळा झाला की नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं, असे आव्हान सुप्रिया सुळेंनी केलं. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा सिंचन घोटाळा होता. बैलगाडी भरून पुरावे भाजपनेच दिले होते. बघा नेमकं कोणाचा दावा काय आहे?