लेकीसाठी बापाची फिल्डिंग? सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार बारामतीच्या मैदानात

| Updated on: Mar 11, 2024 | 11:45 AM

बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे आमने-सामने येणार हे जवळपास निश्चित झालंय. एकीकडे सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे तर दुसरीकडे शरद पवार देखील सुप्रिया सुळे यांच्यासाठी मैदानात उतरले

मुंबई, ११ मार्च २०२४ : बारामती लोकसभा मतदारसंघ कायम राखण्यासाठी शरद पवार आपल्या लेकीसाठी मैदानात उतरले आहेत. शरद पवार सध्या मतदारसंघ पिंजून काढताय. यासोबतच गाठीभेटीवर देखील भरत देताना दिसताय. बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे आमने-सामने येणार हे जवळपास निश्चित झालंय. एकीकडे सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे तर दुसरीकडे शरद पवार देखील सुप्रिया सुळे यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. बारामती मतदार संघात भेटीगाठी घेत शरद पवार यांनी आपल्या लेकीसाठी मतांची गोळाबेरीज करण्याची सुरूवात केली आहे. आपलं राजकीय वैर बाजूला सारत शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांच्या घरी जात भेट घेतली. दरम्यान, एक आठवड्यापूर्वीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील अनंतराव थोपटे यांच्या परिवाराची भेट घेतली होती. पवारांच्या थोपटे कुटुंबीयांच्या भेटी मागचं कारण आहे लोकसभा निवडणुकीतील मतांचं गणित…बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 11, 2024 11:45 AM
ठाकरेंचे आमदार रवींद्र वायकर यांच्यामागे ईडी अन् त्यांची शिंदे गटात उडी?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नेते, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना कानमंत्र