दिल्लीतल्या अदृश्यं हातांनी पेपर फोडून बातमी दिली का? सुप्रिया सुळे यांनी काय व्यक्त केली शंका?
VIDEO | केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्याप्रमाणे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिलं,तसं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हंही अजित पवार यांनाच मिळेल, धनंजय मुंडे यांनी केलेल्या दाव्यावर सुप्रिया सुळे यांनी काय केलं भाष्य अन् निकालाआधीच काय व्यक्त केली शंका?
मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंड झाल्यानं आता कायदेशीर लढाई सुरु झाल्यात. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरही येत्या 6 तारखेला निवडणूक आयोगात सुनावणी आहे. मात्र, त्याआधी अजित दादा गटानं जे दावे केलेत त्यावरुन सुप्रिया सुळे संतापल्यात. आयोगाच्या निकालाआधीच पेपर फुटला का? असा सवाल सुप्रिया ताईंनी केलाय. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांचीही स्थिती सारखीच आहे. धनंजय मुंडे सांगतात त्याप्रमाणं, निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलंय. मात्र राष्ट्रवादी पक्ष तसंच घड्याळ चिन्हंही अजित दादांनाच मिळेल, असा दावाही धनंजय मुंडेंनी केलाय. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेलाय आणि आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हा संदर्भात आयोगात येत्या 6 तारखेला सुनावणी आहे. अर्थात आपण स्वत: त्या सुनावणीला हजर राहणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. मात्र, निकालाआधीच सुप्रिया सुळेंनी शंका व्यक्त केलीय.दिल्लीतल्या अदृश्यं हातांनी पेपर फोडून धनंजय मुंडेंना बातमी दिली का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय.