‘दोन्ही हातावर खून अन् रक्त…तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार?’, सुप्रिया सुळेंचा कोणावर हल्लाबोल?

| Updated on: Oct 06, 2024 | 3:39 PM

पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी अपघात झाला. एका भरधाव पोर्श गाडीनं दुचाकीला धडक दिल्यामुळं दोघांचा मृत्यू झाला होता. तर अपघातामधील अल्पवयीन आरोपीला अजित पवार गट राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून शरद पवार गट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.

Follow us on

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. “वडगाव-शेरीच्या लोकांनी तर काहीच बोलू नये. त्यांच्या दोन्ही हातावर खून अन् रक्त लागले आहे. हा आरोप आहे माझा त्यांच्यावर. कुठल्या तोडांनं ते मतं मागणार आहेत. तुम्ही कुणाची बाजू घेत आहात? आरोपीकडे पोर्श गाडी आहे, म्हणून त्यांची बाजू घेता? पैसे आहेत म्हणून त्यांच्या घरी जाता… दोन लोकांचा जीव गेला. त्या मुलांच्या आईच्या दुःखाचा विचार कधी केलात का? त्यांच्या पालकांना काय वाटत असेल. मी स्वतः त्यांच्याविरोधात प्रचार करून जंग जंग पछाडीन पण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या आईला न्याय देणार. त्याशिवाय गप्प बसणार नाही”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली. पुढे त्या असंही म्हणाल्या, मृत मुलांच्या आईचे अश्रू पुसायला कधी गेला नाहीत. पण आरोपीसाठी पोलीस ठाण्यात बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन गेलात. ते पोलीस ठाणे आहे, तुमच्या घरचं डायनिंग टेबल नाही. ही मस्ती घरी जाऊन दाखवा, सर्वसामान्य माणसांच्या अश्रूंसमोर तुमची मस्ती चालणार नाही, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी एकच संताप व्यक्त केला.