रविंद्र धंगेकर यांच्या विजयाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘मराठी माणूस विकला जात नाही तर…’

| Updated on: Mar 02, 2023 | 6:49 PM

VIDEO | सुप्रिया सुळे यांनी विजयी उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांचे अभिनंदन करताना भाजपवर साधला निशाणा, बघा काय केली टीका

पुणे : कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले असून रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मताधिक्यांनी विजय झाला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे या निवडणुकीत विजयी झाल्याने सुप्रिया सुळे यांनी त्यांचे कौतुक केले. सुप्रिया सुळे यांनी पोटनिवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सत्तेत असलेले साम-दाम-दंड-भेद सगळे वापरून झाले मतदानादिवशीच पैसे वाटप केल्याचा सोशल मीडियावर एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. यामुळे एक गोष्ट साध्य झाली की, मराठी माणूस पैशाने विकला जात नाही, कितीही पैशाचं वाटप करण्यात आलं असलं तरी स्वाभिमानी मराठी माणसाने सच्चा कार्यकर्त्यांला मतं दिलं असून त्यालाच विजयी केले आहे.

Published on: Mar 02, 2023 06:49 PM
‘हा माझा पायगुण’, अवघे ४६ मतं का पडली? अभिजीत बिचकुले यांनी दिलं भन्नाट उत्तर
Chinchwad Election Result | तिरंगी लढतीत अश्विनी जगताप यांनी मारली बाजी