बाबासाहेब पुरंदरे यांचं कार्य विसरता येणार नाही, सुप्रिया सुळेंकडून श्रद्धांजली

| Updated on: Nov 15, 2021 | 11:29 AM

मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं.

पुणे : मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचं निधन वृद्धापकाळानं झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांचं कार्य विसरता येणार नाही, म्हणत  सुप्रिया सुळेंकडून श्रद्धांजली वाहिली.

TOP 9 News | टॉप 9 न्यूज |15 November 2021
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 15 November 2021