Surekha Punekar | प्रवीण दरेकरांनी माफी मागावी, त्याशिवाय शांत बसणार नाही : सुरेखा पुणेकर
सुरेखा पुणेकर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नव्हे तर महिलांचा आदर करणारा पक्ष आहे, असे पुणेकर म्हणाल्या.
मुंबई : सुरेखा पुणेकर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नव्हे तर महिलांचा आदर करणारा पक्ष आहे, असे पुणेकर म्हणाल्या. याच कारणामुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, असेही पुणेकर यांनी सांगितलं. प्रवीण दरेकरांना महिलांचा सन्मान करता येत नसेल तर करू नका मात्र अवहेलना करण्याचा अधिकार दिला कोणी ? असा सवालही पुणेकर यांनी दरेकर यांना केला.