Surekha Punekar | लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

| Updated on: Sep 12, 2021 | 12:37 PM

16 सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश सोहळा होणार आहे. सुरेखा पुणेकरांबरोबर एकूण 12 कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली आहे.

पुणे : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 16 सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश सोहळा होणार आहे. सुरेखा पुणेकरांबरोबर एकूण 12 कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली आहे. लावणी सम्राज्ञी म्हणून सुरेखा पुणेकरांची ओळख आहे. लावणीला महाराष्ट्रासह परदेशातही त्यांनी मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांनी पायात घुंगरू बांधलं आणि लावणी कार्यक्रमांना सुरुवात केली. नटरंगी नार हा त्यांचा कार्यक्रम राज्यभरात सगळीकडे गाजला. या रावजी तुम्ही बसा भावजी , पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, कारभारी दमानं या त्यांच्या लावण्या खूप गाजल्या आहेत. 2019 ला पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसमधून त्यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. तर बिग बॉस या स्पर्धेतही त्या सहभागी झाल्या होत्या. अखेर त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

साकीनाका प्रकरणानंतर महिला आयोग पथक मुंबईत दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ताफा औरंगाबादेत अडवणार, मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका