मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धस यांचा सवाल
मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीची बैठक झाली मग त्याच मंत्र्यावर गुन्हा दाखल का नाही? असा थेट सवालच सुरेश धस यांनी केला आहे. सुरेश धस यांनी ज्या खंडणी प्रकरणाचा उल्लेख केला, ते प्रकरण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित पवनचक्कीच्या आवादा कंपनीचं आहे.
आकाचे आका असा धनंजय मुंडे यांचा उल्लेख भाजप आमदार सुरेश धस करताय. पण पहिल्यांदाच सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्याची मागणी केली आहे. मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीची बैठक झाली मग त्याच मंत्र्यावर गुन्हा दाखल का नाही? असा थेट सवालच सुरेश धस यांनी केला आहे. सुरेश धस यांनी ज्या खंडणी प्रकरणाचा उल्लेख केला, ते प्रकरण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित पवनचक्कीच्या आवादा कंपनीचं आहे. १४ जून रोजी मुंबईच्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर बैठक झाल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, आवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी होते, असा दावाही धसांनी केलाय. पवनचक्कीच्या अवादा कंपनीकडून मुंडेंनीच फोनवरून ३ कोटी मागितल्याचा आरोप धसांनी केला. पण ३ कोटी देण्यास कंपनीने नकार दिल्याने २ कोटीमध्ये डील ठरली आणि त्यापैकी ५० लाख मिळाल्याचाही धसांनी आरोप केला. या खंडणीप्रकऱणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला पण ज्यांच्या घरी बैठक झाली त्यांच्यावर गुन्हा का नाही? असा सवाल सुरेश धसांनी केला.