सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड; म्हणाल्या, लग्नाची यादीही…
काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांची चांगलीच पोलखोल केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या वसुलीचीच यादी वाचून दाखवली. पोलिसांनीच जर अशा पद्धतीने वसुली करण्यास सुरुवात केली तर कायदा सुव्यवस्था कशी राहील? असा सवाल अंधारे यांनी केला आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन पोलीस आणि अधिकाऱ्यांची पोलखोल केली. अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचले पोलिसांचे रेट कार्ड. कुठून कुठून कशी वसूली केली जाते याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली. ही यादी खूप मोठी आहे. लग्नाच्या आहेराची यादीही एवढी मोठी नसते, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं. तेव्हा महसूल मंत्री शंभुराज देसाई यांनी आमच्यावर अब्रू नुकसानीचा खटला भरण्याची भाषा केली. आता काय म्हणणं आहे? आम्ही या प्रकरणाचे पुरावे दिले आहेत, काय करणार आहात? डॉ. तावरेंना ललित पाटील प्रकरणात अटक करायला हवी होती. पण त्यांना आता एका लल्लूपंजू प्रकरणात अटक करण्यात आली आहे, त्यांना तेव्हाच अटक का केली नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
Published on: May 27, 2024 03:56 PM