‘जो बूंद से गयी, वो हौद से नहीं आती’, सुषमा अंधारे यांनी नेमका कुणाला लगावला टोला?

| Updated on: May 14, 2023 | 1:39 PM

VIDEO | पहाटेच्या शपथविधीवर सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यावर सुषमा अंधारे यांचं प्रत्युत्तर, बघा काय म्हणाल्या...

नागपूर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाहटेच्या शपथविधीवर भाष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी धडा शिकवण्याची भाषा केली मला असं वाटते की शिंदे साहेबांसोबत जाऊन त्यांनी आता मोठा धडा शिकलेला आहे. त्यामुळे तो धडा घेतल्यानंतर त्यांना वाटत असेल की आपण आगीतून उठून फुफाट्यात पडलो आहे. काहीतरी टीका करायची कर्नाटकच्या निवडणुका नंतर काहीतरी धास्ती घेतलेली आहे. त्यात शिंदे साहेबांसोबत गेल्यानंतर जी नकारात्मकता वाढत आहे, असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. तर काही करून ‘जो बूंद से गयी वो हौद से नही आती’ ते सुधीर भाऊंच्या लक्षात येत नसावं त्यामुळे ते अशा प्रकारचा स्टेटमेंट देतात, असे म्हणत खोचक टोलाही अंधारे यांनी लगावला आहे.

Published on: May 14, 2023 01:39 PM
काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशावर राज ठाकरे यांनी व्यक्त केलं मत, म्हणाले, ”हा परिणाम”
पहाटेच्या शपथविधीवरून मुनगंटीवार यांच्यानंतर भाजपचा हा नेता ही बोलला, म्हणाला, ”त्यात काही चुकीचं”