Rahul Narwekar : राहुल नार्वेकर यांचं म्हणाल तर ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेची आठवण येते, कुणी लगावला टोला?

| Updated on: Oct 13, 2023 | 6:01 PM

VIDEO | सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात होत असलेल्या दिरंगाईवरून चांगलंच फटकारलं, यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, बघा काय केली सडकून टीका

पुणे, १३ ऑक्टोबर २०२३ | सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शिवसेना अपात्र अमदारांसंदर्भातील सुनावणीच्या प्रकरणावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. विधानसभा अध्यक्षांना आदेश देऊनही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे कोर्टानं म्हटलं आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल नार्वेकर यांचं अपात्र सुनावणीसंदर्भाच्या निकालाचं काम बघितलं तर मला एकच गाजलेली मालिका आठवते, ती मालिका म्हणजे सून मी या घरची..त्यातली जानवी या कॅरेक्टरला दीड ते दोन वर्ष गरोदर असतं पण तिच्या डिलीव्हरीची डेट काही कळत नाही. बाळच होत नाही ते मला सगळं आठवतं. कारण राहुल नार्वेकरांच्या निकालाचे देखील तसेच आहे, तो काही येतच नाही, असे म्हणत राहुल नार्वेकर यांनी खोचक टोला लगावला आहे.

तर राहुल नार्वेकर नेमके कोणत्या कामात व्यस्त आहेत? असा सवाल करत सुषमा अंधारे म्हणाल्या, थोडक्यात शिंदे गटाला मदतच करायची हे नार्वेकर यांनी ठरवले आहे. शहाण्याला शब्दांचा मार असतो हे कळण्या इतके हे लोक विवेकी आहेत का? असे सवाल सुषमा अंधारे यांनी केले.

Published on: Oct 13, 2023 05:56 PM
Sharad Pawar : शिवतीर्थवरील राज ठाकरे अन् दादा भुसे यांच्या बैठकीवर शरद पवार म्हणाले, माझ्या ज्ञानात भर पडली
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना अटक करा, जालन्यातील सभेला विरोध दर्शवत कुणाची मागणी?