Sushma Andhare : ज्यांना इव्हेंट करायचा…, सुषमा अंधारे यांचा दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाला खोचक टोला
VIDEO | एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशा दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याचे जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक शिवसैनिक येणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यावर सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावलाय
पुणे, २४ ऑक्टोबर २०२३ | एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशा दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याचे जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. मोठ्या संख्येने बसेस भरून शिवसैनिक हे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. मोठा आणि अभूतपूर्व ऐतिहासिक दसरा मेळावा आमचा असणार असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. ‘आम्हाला इव्हेंट आणि शक्तिप्रदर्शन करायचं नाही, ज्यांना इव्हेंट करायचा आहे. ते सांगतील त्यांनी किती बसेस बूक केल्यात. आम्ही कोणत्या बसेस बूक केल्या नाही की कुठे गाड्या पाठवल्या नाहीत. ना आमदार खासदारांवर गर्दी जमवण्यासाठी जबाबदारी टाकली नाही. ज्यांना शिवतीर्थाबद्दल आस्था आहे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटायचं असतं असा निष्ठावंत शिवसैनिक आपल्या कष्टाच्या भाकरीला सोबत घेऊन शिवतीर्थावर येतो. तशाच शिवसैनिकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत.’, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.