‘त्या’ पाकिटात काय होतं? सुषमा अंधारे यांचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल

| Updated on: Nov 10, 2023 | 11:09 AM

सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. याआधी एक ड्रग्ज माफिया कसा सरकारी रूग्णालयात उपचार घेत होता. त्या सर्व सुविधा पुरविल्या जात होत्या. यावरून सरकारवर टीका होतेय. अशातच सुषमा अंधारेंकडून नवा व्हिडीओ ट्वीट

मुंबई, १० नोव्हेंबर २०२३ | पुण्यात ललीत पाटील व्हिडीओनंतर अजून एका व्हिडीओने पोलिसांच्या कारभारावर टीका होतेय. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. याआधी एक ड्रग्ज माफिया कसा सरकारी रूग्णालयात उपचार घेत होता. त्या सर्व सुविधा पुरविल्या जात होत्या. यावरून सरकारवर टीका होतेय. अशातच सुषमा अंधारे यांनी नवा व्हिडीओ ट्वीट करून पोलीस आणि कैद्यांमध्ये नेमकी कशाची देवाण घेवाण सुरू आहे? असा प्रश्न विचारलाय. अंधारेंनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी शेअर कलेला व्हिडीओ पुणे जेल रोड परिसरातील आहे. पोलिसांच्या गाडीत कैद्यांना कसलीतरी पाकीटं दिलं जाताय…यावरूनच सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना टार्गेट केलंय. त्या म्हणाल्या… उठा उठा देवेंद्र फडणवीस पोलिसांची गाडी थांबली. पुन्हा एकदा गृह खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली.

Published on: Nov 10, 2023 11:08 AM
Maratha Reservation : … तर मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार, मनोज जरांगे पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
देशातील महानगरं विषारी प्रदूषणाच्या विळख्यात, मुंबई आणि पुण्याची हवा किती दुषित?