Sharad Pawar Resigns | सुषमा अंधारे यांचा शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर फोन अन्…
VIDEO | शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुषमा अंधारे यांचा फोन, काय साधला संवाद?
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एकच गदारोळ पाहायला मिळाला. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत पवार साहेब राजीनाम्याचा निर्णय मागे घ्या अशी विनंती केली. दरम्यान, शरद पवार यांच्या या घोषणेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील शऱद पवार यांना थेट फोन केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सुषमा अंधारे यांनी शरद पवारांना त्यांचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. आणि घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असेही फोनवर सांगितले. भाजपच्या फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
Published on: May 03, 2023 08:05 AM