अन् सुषमा अंधारे यांचा १८ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ सापडला!
VIDEO | सुषमा अंधारे यांच्या बॅनरमुळे १८ वर्षांनंतर भावा-बहिणीची भेट, या कारणामुळे सुषमा अंधारे यांच्या भावाने सोडलं होतं घरं, काय म्हणाल्या बघा...
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा १८ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ पुन्हा त्यांना भेटला आहे. सुषमा अंधारे यांच्या राजकीय सभेच्या बॅनरमुळे सुषमा अंधारे यांचा भाऊ त्यांना तब्बल १८ वर्षांनंतर सापडल्याचे सांगितले जात आहे. युवराज अंधारे असं सुषमा अंधारे यांच्या भावाचं नाव आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याने वास्तव हा चित्रपट पाहून घर सोडले होते. सुषमा अंधारे यांचा भाऊ युवराज अंधारे परत आल्याने घरात संपूर्ण भावनिक वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी टिव्ही ९ मराठीला दिली आहे. बघा काय म्हणताय सुषमा अंधारे…
Published on: Feb 17, 2023 03:45 PM