INDIA आघाडीच्या बैठकीतील मेन्यूवरून ‘मनसे’नं केलेल्या ‘त्या’ टीकेवर सुषमा अंधारे यांचा पलटवार, म्हणाल्या…

| Updated on: Aug 31, 2023 | 4:54 PM

VIDEO | मनसेचे नेते अमेय खोपकर यांचा इंडियाच्या बैठकीवर निशाणा, बैठकीतील पंचपक्वान्नावरून अमेय खोपकर यांची सडकून टीका, तर उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या...

पुणे, ३१ ऑगस्ट २०२३ | मनसे नेते अमेय खोपकर यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडी आणि त्यांच्या जेवणासाठी केलेल्या व्यवस्थेवर ट्विटवरून जोरदार टीका केली. या टीकेवर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार करत प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, ‘`इंडिया`च्या बैठकीमुळे भाजप पक्ष कमालीचा अस्वस्थ झाला आहे. त्यांनी आपल्या सुपारीबाज लोकांना कामाला लावलं आहे आणि या सुपारीबाज लोकांचं अतार्किक ट्विट आणि स्टेटमेंट देणं सुरु झालंय’, त्या पुढे असंही म्हणाल्या, पण अशा लोकांना विसर पडतोय का समृद्धी महामार्गावर २७ लोकांचे जीव गेले. त्यांच्यावर सामूहिक अंत्यविधी होत असताना भाजप एक पक्ष फोडून एक शपथ विधी करत होता. तेव्हा नैतिकतेच्या, महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे ट्विट करण्यासाठी हे सुपारीबाज आंदोलक पुढे आले नाहीत, त्यामुळे त्यांच्या आजच्या बडबडीला अर्थ उरत नाही असे म्हणत सुषमा अंधारे यांनी खोचक टोलाही मनसेला लगावला आहे.

Published on: Aug 31, 2023 04:54 PM
मंत्रालय परिसरात एकच खळबळ! मंत्रालयाजवळ ब्लास्ट, वाहनांचं नुकसान, इमारतीच्या काचा फुटल्या अन्…
सुषमा अंधारे यांचा नवनीत राणा यांना टोला; म्हणाल्या, त्या बाईला धड….