संजय शिरसाट ‘त्या’ वक्तव्यावरुन गोत्यात येणार? सुषमा अंधारे यांच्याकडून परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

| Updated on: Mar 28, 2023 | 7:10 PM

VIDEO | संजय शिरसाट वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी महिला आयोगाचे पोलिसांना आदेश तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांची संजय शिरसाट यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

मुंबई : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी महिला आयोगाने संभाजीनगर पोलिसांना पुढच्या 48 तासात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. संजय शिरसाट यांच्याविरोधात एकीकडे ठाकरे गट आक्रमक झालेला असताना आता दुसरीकडे राज्य महिला आयोगानेही कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अशातच याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात दाखल होत तक्रार दाखल केली. पण परळी पोलिसांनी ही तक्रार दाखल करण्यास नकार दिला असल्याचे सुषमा अंधारे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले. तर दुसरीकडे संजय शिरसाट यांच्याविरोधात पुण्यात ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलं. या शिष्टमंडळाने आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे पोलीस आता याप्रकरणी कोणती कारवाई करणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: Mar 28, 2023 07:08 PM
फेरीवाल्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक, कुठं केली बॅनरबाजी अन् दिला इशारा?
‘देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब…’, ‘त्या’ फेक कॉलनंतर नागपूर पोलीस सतर्क अन् …