पंकजा मुंडे यांच्यासाठी उदयनराजे भोसले राजीनामा देणार? काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
'पंकजा मुंडे यांना मोठ्या मतांनी विजयी करा, पंकजा मुंडे तुमची मुलगी, बहिण आहे. तिला मतदान करायचे नाही तर कोणाला करायचे? माझी भगिनी पंकजा मुंडेला आता संधी मिळाली आहे. तिला भरघोस मतांनी विजयी करा, कृपा करून पंकजा मुंडे हिला निवडून द्या, अन्यथा मी राजीनामा देतो'
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बीडच्या सभेतून मोठं वक्तव्य केलं होते. पंकजा मुंडे यांना मोठ्या मतांनी विजयी करा, पंकजा मुंडे तुमची मुलगी, बहिण आहे. तिला मतदान करायचे नाही तर कोणाला करायचे? माझी भगिनी पंकजा मुंडेला आता संधी मिळाली आहे. तिला भरघोस मतांनी विजयी करा, कृपा करून पंकजा मुंडे हिला निवडून द्या, अन्यथा मी राजीनामा देतो, आणि तिला तिकडून निवडून आणतो, असा शब्द उदयनराजेंनी दिला होता. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. ‘उदयनराजे भोसले यांनी आपला शब्द पाळावा, आपल्या शब्दाला जागावं. खरंच तुम्हाला पंकजा मुंडे यांना निवडून आणायचं आहे, तर राजेंनी राजीनामा दिला पाहिजे. तर राजेंनी राजीनामा देऊन तेथून पंकजा मुंडे यांना निवडून आणलं पाहिजे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
Published on: Jun 23, 2024 04:37 PM