Suspension of MPs in session : इतिहासातील पहिलीच घटना, अधिवेशनकाळात तब्बल ‘इतक्या’ खासदारांचं निलंबन

| Updated on: Dec 19, 2023 | 5:53 PM

संसदेच्या सुरक्षेबाबत झालेल्या गदारोळामुळे खासदारांचे निलंबन अद्याप सुरूच, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अधिवेशन काळात तब्बल १४१ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पहिल्यांदाच अधिवेशनकाळात १४१ खासदारांचं निलंबन करत खासदार निलंबनाचा रेकॉर्ड करण्यात आलाय.

मुंबई, १९ डिसेंबर २०२३ : संसदेच्या सुरक्षेबाबत झालेल्या गदारोळामुळे खासदारांचे निलंबन अद्याप सुरूच आहे. दोन दिवसांत १४० हून अधिक खासदारांना निलंबित करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अधिवेशन काळात तब्बल १४१ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पहिल्यांदाच अधिवेशनकाळात १४१ खासदारांचं निलंबन करत खासदार निलंबनाचा रेकॉर्ड करण्यात आलाय. १८ नोव्हेंबर रोजी एकूण ९२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. यामध्ये लोकसभेचे ४६ तर राज्यसभेचे ४६ खासदार होते. १९ डिसेंबरला लोकसभा ४९ लोकसभा खासदारांचं निलंबन करण्यात आलं. दरम्यान, या खासदारांचं निलंबन नेमकं कोणत्या कारणामुळे करण्यात आलं याची या कारवाईनंतर चर्चा होऊ लागली. विरोधकांकडून मर्यादेचा भंग करण्यात आला, विरोधकांकडून मुद्दाम अडथळा, विरोधक वेळ वाया घालवत आहेत, असा आरोप सरकारने विरोधकांवर केला.

Published on: Dec 19, 2023 05:52 PM
जीवनाची पुंजी बँकेत जमा केली अन्… ठेवीदार रडकुंडीला; भावना झाल्या अनावर
Maratha Reservation : २४ डिसेंबरपर्यंत सरकारला डिस्टर्ब करणार नाही, पण २४ नंतर जाहीरपणे सांगतो…