Sanjay Raut : युवक प्रतिष्ठानला मिळालेल्या देणग्या संशयास्पद, संजय राऊतांचे ट्विट
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांना लक्ष्य केलंय.
मुंबई : युवक प्रतिष्ठानला मिळालेल्या देणग्या संशयास्पद असल्याच्या आशयाचं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. ‘NSEL 5600 कोटी शेअर्स घोटाळा चौकशीची मागणी किरीट सोमय्या ने केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ED ने चौकशी केली. स्वतः किरीट चौकशी साठी कंपनी शिपायांचे घरी गेले. तमाशा केला.2018 19 असे 2 वर्ष सोमय्या ने मोतीलाल ओसवाल कडून लाखो रुपये त्याच्या युवक प्रतिष्ठान साठी घेतले!’ असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये (Tweet) म्हटलंय. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांना (kirit somaiya) लक्ष्य केलंय.
Published on: May 11, 2022 10:53 AM