जाळ अन् धूर संगाटच…बळीराजाची अडवणूक करताच बँक मॅनेजरला सणसणीत लगावली; कुठे घडला प्रकार?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका नेत्याने थेट बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये राडा केल्याचे पाहायला मिळाले. जालना जिल्ह्यातील वरुड बुद्रुक येथील शाखेत हा प्रकार घडला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे यांनी बँक व्यवस्थापकाच्या चांगलीच कानशिलात लगावत त्यांना मारहाण केली तर. बँक व्यवस्थापक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप ही त्यांनी केला.
जालना जिल्ह्यात बळीराजाच्या मदतीला स्वाभिमानी शेतकरी संघटना धावून आली आहे. जालना जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरूड बुद्रुक येथील शाखेत शेतकऱ्याला विनाकारण त्रास आणि अडवणूक केली जात होती. दुष्काळाचे अनुदान, दुधाचे अनुदान, घरकुलाचे अनुदान, विधवा, निराधार, वयोवृध्द या सर्वांच्या पैशाला थांबवून पिक कर्ज भरून द्या, अशी अडवणूक बँकेकडून शेतकऱ्याची केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. याच कारणामुळे शाखा व्यवस्थापकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयुर बोर्डे यांनी कानशिलात लागवत चांगलाच चोप दिला. शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देत अडवणूक केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्याची कामे लवकरात लवकर करून द्यावेत, असे सांगितले तर शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल मयुर बोर्डे यांनी या बँक अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली.