शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे चाट मसाला, कुणी दिली खोचक प्रतिक्रिया
VIDEO | स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया, बघा काय म्हणाले
कोल्हापूर : राज्याचे अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केल्यानंतर विरोधकांकडून टीका होत आहे. अशातच माजी खासदार राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, राज्य सरकारचे बजेट म्हणजे चाट मसाला आहे. ज्या प्रमाणे चाट मसाला तेवढ्यापुरते चविष्ट वाटतं पण हाताला काही लागत नाही त्याप्रमाणे राज्याच्या अर्थसंकल्पाचेही असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने 6 हजार प्रोत्साहन अनुदान जाहीर केले आहे पण केवळ रासायनिक खतांचा विचार केला तर त्यामध्ये कितीतरी पटीने वाढ झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांची अवस्था घर का ना घाट का अशी झाली होती त्यांच्याबाबत घेतलेला निर्णयही स्वागतार्ह असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
Published on: Mar 09, 2023 07:27 PM