स्वाभिमानी कार्यकर्त्यानं उधळले रस्त्यावर पैसे! आक्रमक होण्याचं कारण काय?
VIDEO | हिंगोलीमध्ये पैशाची उधळण करत आंदोलन, स्वाभिमानी कार्यकर्ता आक्रमक होण्याचं कारण तरी काय?
हिंगोली : हिंगोलीमध्ये स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना पेस्टिसाइड कंपनी चुकीचे औषध देत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला आहे. यावेळी स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चक्क नोटा उधळल्याचा पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी कृषी विभागा विरोधात हे अनोखं आंदोलन केल्याने सगळेजण आश्चर्य व्यक्त करतात. कंपनी शेतकऱ्यांना चुकीचे औषध देत असल्याने पिकांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. विशेष म्हणजे राज्याचे कृषिमंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा जिल्हा असलेल्या या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी नोटांची उधळण रस्त्यावर केल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये स्वाभिमानीचा एक कार्यकर्ता रस्त्यांवर नोटा उधळत असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी तो अधिकाऱ्यांकडे करताना दिसत आहे. तसेच कंपन्या शेतकऱ्यांना जैविक औषध म्हणून घातक औषध देतात असा आरोपही यावेळी त्यांनी केलाय