Pune | काही महिन्यांपूर्वी जर स्वप्नीलचे यादीत नाव असते तर तो आज आमच्यात असता, वडिलांची प्रतिक्रिया

| Updated on: Dec 15, 2021 | 11:06 AM

एमपीएससीने साडेपाच महिन्यांपूर्वीच मुलाखतीची यादी जाहीर केली असती तर आज स्वप्नील आमच्यात असता अशी प्रतिक्रिया त्याच्या आई वडिलांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केली.

एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही मुलाखत न झाल्यानं नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. याघटनेला साडेपाच महिने पूर्ण झाल्यानंतर एमपीएससीच्या वतीनं स्वप्नीलच नाव मुलाखतीच्या यादीत जाहीर करण्यात आलंय. याप्रकारानंतर एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एमपीएससीने साडेपाच महिन्यांपूर्वीच मुलाखतीची यादी जाहीर केली असती तर आज स्वप्नील आमच्यात असता अशी प्रतिक्रिया त्याच्या आई वडिलांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केली.

Girish Mahajan | पोलीस काय मोक्का लावतात, कुठे मुके घेतात ते बघू : गिरीश महाजन
Viay Wadettiwar | सुप्रीम कोर्टाचा निकाल ओबीसींच्या बाजूनं लागेल अशी खात्री : विजय वडेट्टीवार