Breaking | कोरोनानंतर आता आणखी एका व्हायरसचा धोका, भारतात झिका व्हायरसचा शिरकाव

| Updated on: Jul 09, 2021 | 12:19 PM

जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसमुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरत आली आहे. मात्र, तिसरी लाट येण्याची भिती अजूनही आहे. संपूर्ण देश कोरोनासोबत दोन हात करत असतानाच आता झिका व्हायरसने देखील देशात एन्ट्री केली आहे.

जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसमुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरत आली आहे. मात्र, तिसरी लाट येण्याची भिती अजूनही आहे. संपूर्ण देश कोरोनासोबत दोन हात करत असतानाच आता झिका व्हायरसने देखील देशात एन्ट्री केली आहे. यामुळे अधिकच धोका वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एका गर्भवती महिलेला या झिका व्हायरसची लागण झाली आहे. या झिका व्हायरसचे जवळपास 13 रूग्ण केरळ राज्यात आढळले आहेत. (Symptoms of new zika virus)

झिका व्हायरसची लक्षणे 

झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे, अंगदुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे तसेच या व्हायरल दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरलचे प्रमुख लक्षण आहे. मात्र, सुरूवातीला आलेल्या तापावरून झिका व्हायरल कळणे थोडे कठीण आहे.

Nagpur Metro | नागपूर मेट्रोचा दावा फोल, मनिषा नगर अंडरपासखाली गुडघाभर पाणी
Ameet Satam | मुंबई पालिकेत 5 हजार कोटींचा घोटाळा, भाजप आमदार अमित साटम यांचा आरोप