‘बरं झालं त्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला…’, विधानभवनात सूर्याच्या कॅचवरून रोहित शर्माचा मिश्किल टोला

| Updated on: Jul 05, 2024 | 5:44 PM

Rohit Sharma on Suryakumar yadav : विधानभवनातील सत्कार सोहळ्यातील कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादव याने फायनलच्या ग्राऊंडवरील बॉड्रीवर घेतलेल्या कॅचबाबत एक लक्षवेधक प्रतिक्रिया दिली. रोहित शर्माच्या या मिश्किल मनोगतानंतर विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये एकच हस्यकल्लोळ पाहायला मिळाला

Follow us on

टी 20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा मुंबईतील विधानभवनात आज सन्मान करण्यात आला. विधानभवनात टीम इंडियाचा कर्णाधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चौघांच्या नावाचाच जयजयकार आजही पाहायला मिळाल. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये भारतीय संघातील या चार मुंबईकर खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचेच आभार व्यक्त केले. विधानभवनातील सत्कार सोहळ्यातील कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादव याने फायनलच्या ग्राऊंडवरील बॉड्रीवर घेतलेल्या कॅचबाबत एक लक्षवेधक प्रतिक्रिया दिली. रोहित शर्मा म्हणाला “मिळालेलं यश संपूर्ण टीम इंडियाचं आहे. आणि त्यावेळी बरं झालं सूर्यकुमारच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला आम्ही बसवला असता”, असं म्हणत रोहित शर्माने मिश्किल भाष्य करत त्याला टोला लगावला. रोहित शर्माच्या या मिश्किल मनोगतानंतर विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये एकच हस्यकल्लोळ पाहायला मिळाला.