सूर्याबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर हार्दिक पांड्यानं जे उत्तर दिलं त्यानंतर मोदींनाही हसू आवरलं नाही, बघा व्हिडीओ

| Updated on: Jul 05, 2024 | 6:02 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हार्दिक पांड्याला आपल्या भावना व्यक्त करण्यास सांगितल्या. हार्दिक पांड्याचं मन यावेळी भरून आलं होतं. सर्वप्रथम त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यानंतर आपल्या भावना मनमोकळ्यापणाने मांडण्यास सुरुवात केली. बघा व्हिडीओ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेदरम्यान हार्दिक पांड्याला आपल्या भावना व्यक्त करण्यास सांगितल्या. हार्दिक पांड्याचं मन यावेळी भरून आलं होतं. सर्वप्रथम त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यानंतर आपल्या भावना मनमोकळ्यापणाने मांडण्यास सुरुवात केली. “मागचे सहा महिने माझ्यासाठी खूपच विचित्र होते. यात बराच चढउतार पाहायला मिळाला. मी मैदानात गेलो तेव्हा क्रिकेटप्रेमींनी डिवचलं चिडवलं. खूप काही घटना घडल्या. पण मी कायम एकच लक्षात ठेवलं की उत्तर द्यायचं तर फक्त आपल्या खेळाने… त्यावेळी काहीच बोललो नाही, शब्द फुटत नव्हते आणि आताही शब्द फुटत नाही. मी कायम एक गोष्ट शिकलो ती म्हणजे युद्धात कायम लढत राहिलं पाहिजे आपलं कधीच मैदान सोडायचं नाही. वाईट काळही इथेच पाहायला मिळतो आणि यशपण इथेच दिसतं.” यावेळी मोदींनी हार्दिकला विचारलं की शेवटच्या षटकात सूर्याला काय सांगितलं? तेव्हा हार्दिक जे म्हणाला त्याने मोदींना पण हसू आवरलं नाही. बघा व्हिडीओ

Published on: Jul 05, 2024 06:02 PM
‘बरं झालं त्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला…’, विधानभवनात सूर्याच्या कॅचवरून रोहित शर्माचा मिश्किल टोला
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका