बंडखोर, गद्दार हे आमदारांना दिलेले टॅग हटवले जावेत- दिपाली सय्यद
दिपाली सय्यद यांनी भाजपला एक पत्र लिहिलं आहे. या पत्राबाबतही त्या यावेळी व्यक्त झाल्या. शिंदेंनी निवडणुका जिंकल्या त्या शिवसेनेकडून जिंकल्या, त्यामुळे त्यांना काहीही बोललं तरी ते ऐकून घेतील असं समजू नका, असं त्यांनी पत्रात लिहिल्याचं सांगितलं.
“बंडखोर, गद्दार हे जे टॅग आमदारांना लागले आहेत, ते मिटले पाहिजेत. आपला हा एक कुटुंब आहे. मला खात्री आहे की कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे जे निर्णय घेतील, तो चांगलाच असेल. वडील म्हणून मुलांना कशापद्धतीने लाइनवर आणायचं, किंवा काय करायचं ते त्यांना ठाऊक आहे. या सगळ्या गोष्टींचा चांगला सुवर्णमध्य काढून सगळ्यांनी एकत्र यावं. जेणेकरून ग्राऊंड लेव्हलला सर्वांना जोमाने काम करता येईल,” अशी प्रतिक्रिया दिपाली सय्यद यांनी दिली आहे. दिपाली सय्यद यांनी भाजपला एक पत्र लिहिलं आहे. या पत्राबाबतही त्या यावेळी व्यक्त झाल्या. शिंदेंनी निवडणुका जिंकल्या त्या शिवसेनेकडून जिंकल्या, त्यामुळे त्यांना काहीही बोललं तरी ते ऐकून घेतील असं समजू नका, असं त्यांनी पत्रात लिहिल्याचं सांगितलं.
Published on: Jul 08, 2022 01:44 PM