स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण नाही, ‘झेंडावदन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा’; कुणी केली मागणी?
VIDEO | पुण्यातील पिंपरी- चिंचवडमधील आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण न झाल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आक्रमक झालेत
पुणे, १८ ऑगस्ट २०२३ | नुकताच राज्यभरासह देशभरात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. यंदाही पंतप्रधान मोदी यांनी हर घर तिरंगा लावण्यास जनतेला आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींनी केलेल्या या आवाहनानंतर प्रत्येक नागरिकाने आपल्या लहान-मोठ्या घरावर तिरंगा अभिमानाने फडकवल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पुण्यातील पिंपरी- चिंचवडमधील आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण न झाल्याचे समोर आले आहे. पिंपरी- चिंचवडमधील आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण न झाल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आक्रमक झालेत. शासकीय वस्तीगृहात आंदोलन केल असून वस्तीगृहाचे गृहपाल यांना तातडीने निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावं अशी मागणी केलीय. तर गृहपाल यांनी नवीन इमारत असल्याने त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी ध्वजस्तंभ नसल्याने आम्ही ध्वजारोहण केलं नाही असं कारण दिलंय.