Anil Parab | संप मागे घ्या, कामावर या आणि एसटी सुरु करा, अनिल परब यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
गेल्या काही दिवसांपासून राज्यातले एसटी कर्मचारी राज्यव्यापी संपावर होते. हा संप 15 दिवस चालल्यानंतर राज्य सरकारनं ऐतिकासिक 41 टक्के पगारवाढ जाहीर केली. आणि संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं.
मुंबई : संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी गंभीर इशारा दिला आहे. काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत तर काही एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. त्यामुळे हट्ट करून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल असा इशारा त्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून देण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातले एसटी कर्मचारी राज्यव्यापी संपावर होते. हा संप 15 दिवस चालल्यानंतर राज्य सरकारनं ऐतिकासिक 41 टक्के पगारवाढ जाहीर केली. आणि संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं.