Satara | निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, गृह राज्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश
राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. त्या निर्बंधांची राज्यासह जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस विभागाला केल्या आहेत.
सातारा : राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. त्या निर्बंधांची राज्यासह जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस विभागाला केल्या आहेत. यावेळी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर सातारा पोलीस मुख्यालयातून व्हिसीद्वारे देसाई यांनी संवाद साधला. या ऑनलाइन कॉन्फरन्समध्ये राज्य शासनाने रात्रीची संचार बंदी लागू केलेली आहे. विनाकारण कोणी रस्त्यावर फिरत असल्यास त्याच्यावर कारवाई करावी, तसेच शासनाने लावलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करा. जे कुणी नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश राज्यातील पोलीस दलाला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.