Rajesh Tope | दोन डोस ज्या लसीचे घेतले त्याच लसीचा तिसरा डोस घ्यावा : राजेश टोपे
नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक ज्या लसीचे दोन डोस घेतले आहेत त्याच लसीचा तिसरा डोस घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक ज्या लसीचे दोन डोस घेतले आहेत त्याच लसीचा तिसरा डोस घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राज्यात 10 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस द्यायला सुरुवात होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. हे बुस्टर डोस सर्व ठिकाणच्या केंद्रांवर मिळतील. महाराष्ट्रात सध्या कोव्हिशील्डच्या 60 लाख, तर कोव्हॅक्सिनच्या 40 लाख डोसचा तुटवडा आहे. आम्ही ही गोष्ट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्राला लसींचा साठा कमी पडू देणार नाही, अशी आशा असल्याचे राजेश टोपे म्हणाले.
Published on: Jan 08, 2022 04:30 PM