Afghanistan | अफगणिस्तानची महिला गव्हर्नर सलिमा मजीरा अखेर तालिबान्यांच्या ताब्यात

| Updated on: Aug 18, 2021 | 2:46 PM

अफगाणिस्तानची पहिला महिला गव्हर्नर सलिमा मजिरा हिला तालिबान्यांनी पकडलं आहे. सलिमा मजिरा हिनं तालिबान्यांविरोधात बंदूक हाती घेतली होती. अफगाणिस्तानचे मोठमोठे नेते देश सोडून पळून गेले होते मात्र सलिमा लढत होती.

अफगाणिस्तानची पहिला महिला गव्हर्नर सलिमा मजिरा हिला तालिबान्यांनी पकडलं आहे. सलिमा मजिरा हिनं तालिबान्यांविरोधात बंदूक हाती घेतली होती. अफगाणिस्तानचे मोठमोठे नेते देश सोडून पळून गेले होते. मात्र,  सलिमा मजिरा ही तालिबान्यांविरोधात लढत होती. अखेर तिला तालिबान्यांनी पकडलं आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानात अफरातफरी माजली असताना, पाकिस्तानने या देशाला बुडवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले. पाकिस्तानने तालिबानला  आधीपासूनच मदत केल्याचे पुरावे समोर आले होते. आता तर पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात तैनात झाल्या आहेत. तालिबानने सत्तेचा दावा केल्यानंतर पाकिस्तानचे दहशतवादी आता तिथल्या सामान्य नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात करत आहेत. ताज्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात घुसून, काही भागात सामान्य जनतेची लुटालूट करत आहे.

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 18 August 2021
Amit Deshmukh | नाट्यगृहांना अटी शर्ती घालून सुरु करण्याबाबत तयार, मात्र टास्क फोर्सचं मत महत्त्वाचे