Afghnistan Update | तालिबानने आयात-निर्यात मार्ग रोखला, भारतातील व्यापाराला फटका

| Updated on: Aug 19, 2021 | 8:54 AM

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 2021 मध्ये आतापर्यंत चांगला व्यापार झाला आहे. या कालावधीत भारताने अफगाणिस्तानात 835 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तर अफगाणिस्तानमधून 510 कोटी डॉलर्स मुल्याच्या वस्तू आयात करण्यात आल्या आहेत.

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणे यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. एकीकडे भारत तालिबानसंदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची, या संभ्रमात आहे. परंतु, तालिबानने भारताविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार आता अफगाणिस्तानात भारताला व्यापारी आणि आयात-निर्यातीसाठी बंदी घालण्यात आली आहे.

भारतीय निर्यात संघटनेचे संचालक डॉ. अजय सहाय यांनी यासंदर्भातील माहिती दिली. तालिबानने व्यापारी मालाची वाहतूक बंद केली आहे. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमार्गे मालाची ये-जा होत असे. मात्र, आता तालिबान्यांनी हाच मार्ग रोखून धरल्यामुळे अफगाणिस्तानमधील आयात-निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. भविष्यात तालिबानी प्रशासक काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष राहील, असे अजय सहाय यांनी सांगितले.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 2021 मध्ये आतापर्यंत चांगला व्यापार झाला आहे. या कालावधीत भारताने अफगाणिस्तानात 835 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तर अफगाणिस्तानमधून 510 कोटी डॉलर्स मुल्याच्या वस्तू आयात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, अफगाणिस्तानमध्ये भारताने तब्बल 400 प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीचा हा आकडा तब्बल 22 हजार कोटी रुपयांच्या घरात जातो.

Weather Alert today : मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज, कुठे कुठे पाऊस बरसणार?
Afghnistan Update | तालिबानने आयात-निर्यात मार्ग रोखला, भारतातील व्यापाराला फटका