Rajyapal | राज्यपाल कोश्यारींचा आज रायगड, रत्नागिरी दौरा
तळीये ग्रामस्थांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी तळीयेला भेट दिली होती. त्यापाठोपाठ आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील तळीये गावच्या पाहणीसाठी रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलार देखील आहेत.
रायगडच्या महाड तालुक्यातील तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 35 घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडीखाली दबलेले 32 मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन कालपर्यंत 53 मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजूनही 32 नागरिक बेपत्ता आहेत. ग्रामस्थांनी बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित करण्याची मागणी केली आहे. तर, तळीये ग्रामस्थांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी तळीयेला भेट दिली होती. त्यापाठोपाठ आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील तळीये गावच्या पाहणीसाठी रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलार देखील आहेत.