‘बेस्ट’च्या बसमध्ये आता ‘बोंबाबोंब’ बंद ! काय आहे प्रशासनाचा मोठा निर्णय?
VIDEO | 'बेस्ट'बसने प्रवास करताय? आता 'बेस्ट'मध्ये गाणी ऐकू नका किंवा मोठ्यानं बोलू नका नाहीतर...
मुंबई : तुम्ही मुंबईकर असाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. मुंबईत प्रवास करताना तुम्ही बेस्ट बसचा आधार घेत असाल तर आता बेस्ट बसमध्ये तुम्हाला मोबाईलवर मोठ्यानं बोलता येणार नाही. इतकंच काय तर मोठ्याने किंवा ईअरफोनशिवाय गाणी, व्हिडीओ ऐकणं आता महागात पडणार आहे. असं केल्यास प्रवाशांना थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कारण प्रवाशांना याकरता बेस्टकडून मनाई करण्यात आली आहे. असं काही आढळल्यानंतर प्रवाशी आता थेट तक्रार करू शकणार आहे. त्याकरता बेस्टकडून तक्रारीसाठी प्रवाशांना हेल्पलाईन नंबर देण्यात येणार आहे. मात्र बेस्टमध्ये ईअरफोनशिवाय गाणी, व्हिडिओ प्रवाशांनी ऐकले तर प्रवाशांवर थेट कारवाई करण्याचा मोठा निर्णय बेस्टकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भात बेस्टच्या वाहतूक विभागाकडून एक पत्रक देखील काढण्यात आलं आहे. यामध्ये बेस्ट प्रशासनाकडून कायदेशीर कारवाईची मुंबईतील सर्व बेस्ट आगारांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.