मुंबईमध्ये चहा आणि कॉफीप्रेमींच्या खिशाला कात्री बसणार – Mumbai -Tv9
चहा आणि कॉफी प्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कारण आता तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबईत चहा आणि कॉफी दोन्ही महागणार आहे अशी माहिती समोर आली आहे. येत्या काळात अन्यही गोष्टी महागण्याची शक्यता आहे.
मुंबई : चहा आणि कॉफी प्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कारण आता तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबईत चहा आणि कॉफी दोन्ही महागणार आहे अशी माहिती समोर आली आहे. येत्या काळात अन्यही गोष्टी महागण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धाचाही भारतातील महागाईवर परिणाम होताना दिसू लागले आहेत. ते येत्या काळात आणखी गडद होण्याची शक्यता आहे. सर्वा आधी याची सुरूवात तेलाच्या किंमतीपासून झाली आहे. रशियाची तेल आणि गॅसच्या सपलायमध्ये मोठी भूमिका असल्याने याच गोष्टी महागत आहेत.