ईईईईई… घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय? व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियामुळे कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल, हे काही सांगता येत नाही. सोशल मीडियामुळे एखाद्या चांगल्या कामाचे जितके कौतुक होते. तितकेच काही व्हिडीओ असेही त्यावर व्हायरल होतात. ज्यामुळे आपण सतर्क होतो. तर काही व्हिडीओने प्रशासन खडबडून जागं होतं.
जळगाव येथील महापालिकेमध्ये प्रसाधन तसेच शौचालय गृहात बेसिंगमध्ये चहाचे कप धुतले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगावातील महापालिकेत आयुक्त यांच्याकडे तसेच दालनात येणाऱ्या मान्यवरांसाठी ज्या कपात चहा दिला जातो, ते सर्व चहाचे कप चक्क आयुक्तांच्या कार्यालयाजवळ असलेल्या प्रसाधन गृहामध्ये तसेच शौचालय गृहात धुतले जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याच प्रसाधनगृहामध्ये शौचालय सुद्धा असून या ठिकाणी असलेल्या बेसिंगमध्ये शिपायाकडून देण्यात येणाऱ्या चहाचे कप धुतले जात आहे. हाच प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. तर आयुक्ताच्या दालनात कार्यालयातील मान्यवरांसाठी देण्यात येणाऱ्या चहाचे कप या ठिकाणी असणाऱ्या प्रसाधन गृहातील बेसिंगमध्ये धुण्यात येत असल्याचे व्हीडिओमधून पाहायला मिळत आहे. दरम्यान महापालिकेतील या प्रकाराबद्दल तसेच कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.