गुरू म्हणावं की हैवान, बदलापूरनंतर या जिल्ह्यात शिक्षकाकडून 1-2 नाही तर इतक्या विद्यार्थ्यींचा विनयभंग, अश्लील व्हिडीओ…

| Updated on: Aug 21, 2024 | 1:47 PM

काजी खेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थिनीचा छळ केलाय. या घटनेमुळे अकोला जिल्हा हादरून गेला आहे. शिक्षकाने शाळेतच 6 मुलींचा विनयभंग केला असून अश्लील व्हिडिओ दाखवत शिक्षकाने छळ केल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणांत उरण पोलीस स्टेशनमध्ये शिक्षक प्रमोद सरदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापूरात घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर राज्यभरात एकच आक्रोश पाहायला मिळत आहे. बदलापूरमध्ये अल्पवयीन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी बदलापुरकरांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणावर कोणती ठोस शिक्षा आरोपीला सुनावण्यात आली नसताना अकोल्यातून एक बातमी समोर येत आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काजीखेडा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शाळेतील शिक्षकाकडूनच एक नाही दोन नाही तर सहा विद्यार्थीनींचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थींनीना शिक्षकाने अश्लील व्हिडीओ आणि फोटो दाखवले होते. या प्रकरणात आरोपी शिक्षक प्रमोद सरदारला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आज आरोपी शिक्षकाला पोलीस अकोल्याच्या न्यायालयात हजर करणार असून आरोपीची पोलीस पीसीआर मागणार आहेत. तर आज पुन्हा पोलीस शाळेत चौकशीसाठी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

Published on: Aug 21, 2024 12:59 PM