महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे शिक्षक 14 मार्चपासून संपावर, कोणती आहे प्रमुख मागणी?

| Updated on: Mar 10, 2023 | 9:27 AM

VIDEO | 1 मार्च रोजी शासनाला नोटीस दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे शिक्षक 14 मार्चपासून संपावर, बघा कोणती आहे मुख्य मागणी

नाशिक : दिनांक 14 मार्च 2023 पासून महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे प्राथमिक शिक्षक जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी संपावर जाणार आहे. 1 मार्च रोजी शासनाला तशी नोटीस देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या वतीने देण्यात आली. 2005 नंतर नोकरीत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही प्रमुख मागणी आहे. या संपात सर्व शिक्षकांनी सहभागी होऊन संप यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, नवी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांची आहे. जवळपास 17 लाख सरकारी कर्मचारी आणि शिक्षक 14 मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा, नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत गाजला होता. पण सरकारकडून जुन्या पेन्शन योजनेवर कर्मचाऱ्यांना ठोस आश्वासन हवंय. त्यामुळे 14 तारखेआधीच कर्मचाऱ्यांना शांत करण्याचं आव्हान सरकारसमोर असणार आहे.

Published on: Mar 10, 2023 09:27 AM
HSC Exam Paper Leak | 12 वीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी एकाला अटक, एकूण आरोपींची संख्या आठवर
‘३५० वर्षानंतर पुन्हा तोच योग’, शिवसेनेच्या या देशाव्याची होतेय सर्वत्र चर्चा, बघा व्हिडीओ