India win T20 World Cup 2024 : ‘हा माझा शेवटचा…’, T20 विश्वचषक जिंकला अन् रोहित शर्माची मोठी घोषणा
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या तुफान गोलंदाजी आणि फिल्डिंगच्या बळावर मॅच वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचल्याचे पाहायला मिळाले अशातच टीम इंडियाला टी 20 वर्ल्डकप चॅम्पियन केल्यानतंर कॅप्टन रोहित शर्मा याने मोठी घोषणा केली आहे.
टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका असा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलचा सामना शेवटी शेवटी अगदी रोमांचक ठरला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या तुफान गोलंदाजी आणि फिल्डिंगच्या बळावर मॅच वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचल्याचे पाहायला मिळाले आणि टीम इंडियाने 17 वर्षांनंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकला. दरम्यान टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर आणि टीम इंडियाला टी 20 वर्ल्डकप चॅम्पियन केल्यानतंर कॅप्टन रोहित शर्मा याने मोठी घोषणा केली आहे. रोहित शर्मा याने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. ‘हा माझा शेवटचा सामना होता. टी-20 फॉरमॅटमधील प्रत्येक सामन्यातील क्षण मी एन्जॉय केला.’, असे वक्तव्य निवृत्तीची घोषणा केल्यानंतर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली. बघा नेमकं काय म्हणाला….?