Nashik Crime News | नाशकात भाजीपाला विक्रेत्याच्या निर्घृण हत्येनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण

| Updated on: Nov 24, 2021 | 4:59 PM

म्हसरूळच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ वार मंगळवार रोजी पेठरोडवर मध्यरात्रीच्या सुमारास भाजीपाला विक्रेत्याची निर्घृण हत्या झाली.यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता असताना, अशा पद्धतीने होणाऱ्या घटनांमुळे शहरांतील नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे दिसून येतय

म्हसरूळच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ वार मंगळवार रोजी पेठरोडवर मध्यरात्रीच्या सुमारास भाजीपाला विक्रेत्याची निर्घृण हत्या झाली.यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता असताना, अशा पद्धतीने होणाऱ्या घटनांमुळे शहरांतील नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे दिसून येतय. क्षुल्लक कारणावरून थेट जीवानीशी ठार करण्याची प्रवृत्ती वाढतेय. खुनाच्या घटनांनी नाशिक शहराला हादरे बसत आहेत. या घटनांमध्ये पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंताजनक आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे. वेळीच यात सुधारणा झाली नाही तर गुन्हेगारी आणखी गंभीर रूप धारण करेल ती वेळ दूर नाही.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 24 November 2021
ST Strike Meet | कमी पगार असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, सूत्रांची माहिती