Accident : भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, अहमदनगर-मनमाड महामार्गावरील घटना
या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय. चौघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला आणि मुलाची उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.
अहमदनगर : राहुरी (Rahuri) तालुक्यातील गुहा या गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. हा अपघात (terrible accident) अहमदनगर-मनमाड मार्गावर झाला असून अहमदनगरहून सटाण्याला जाणऱ्या कारला बसनं धडक दिल्याची माहिती आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय. चौघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला आणि मुलाचा उपचारासाठी नेताना मृत्यू झालाय. चारही मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असून ते मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh)असल्याची माहिती आहे.
Published on: May 15, 2022 05:53 PM