Pune | कात्रजमध्ये गॅस सिलेंडरचा भयानक स्फोट

Pune | कात्रजमध्ये गॅस सिलेंडरचा भयानक स्फोट

| Updated on: Mar 29, 2022 | 7:32 PM

या स्फोटाच्या आवाजांनी संपूर्ण परिसर हादरुन गेला होता. नेमका हा स्फोट कोणत्या कारणामुळे झाला, याची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र या स्फोटानंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्याचं कळतंय.

पुणे : एका पाठोपाठ एक स्फोट होण्याची दृश्य गेल्या काही काळापासून फक्त युक्रेनमध्येच (Ukraine Russia Crisis) दिसून येत होती. मात्र महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील स्फोटाच्या घटनेनं सगळ्यांना हारवलं आहे. प्रथमदर्शनी हा युक्रेनमधलाच व्हिडीओ (Ukraine Blast video) आहे की काय, अशी शंका कुणालाही येऊ शकेल. मात्र हा व्हिडीओ पुण्यातील कात्रज (Pune Katraj Blast) परिसरातला आहे. पुण्यातील कात्रजमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले. सिलिंडरच्या स्फोटांनी कात्रज परिसर हादरुन गेला आहे. धडकी भरवणारे स्फोटाचे आवाज या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहेत. या स्फोटाच्या आवाजांनी संपूर्ण परिसर हादरुन गेला होता. नेमका हा स्फोट कोणत्या कारणामुळे झाला, याची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र या स्फोटानंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्याचं कळतंय.

हिंदू सणांना परवानगी देताना सरकारला लकवा का? – Ashish Shelar
Ratnagiri विमानतळासाठी 100 कोटी, Aditya Thackeray यांची माहिती