टीईटी परीक्षा गैरप्रकारातील मुख्य आरोपींना 3 कोटी 85 लाख रुपये दिल्याचा आरोप, पुणे पोलिसांकडून नाशिक जळगावमध्ये अटकसत्र
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी दोघांना नाशिक आणि जळगाव मधून अटक केली आहे. नाशिक येथून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि चाळीसगाव येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधील गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत चाललीय. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) नाशिक आणि जळगावमधून दोघांना अटक केली आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी दोघांना नाशिक आणि जळगाव मधून अटक केली आहे. नाशिक येथून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि चाळीसगाव येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या दोघांनी मिळून 350 परीक्षार्थींकडून तीन कोटी 85 लाख रुपये घेऊन ते एजंटमार्फत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात समोर आलीय.