Breaking | राज्यभरात रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा, उमेदवार ST संपामुळं परीक्षेला मुकण्याची शक्यता
रविवारी राज्यभरात टीईटी ( शिक्षक पात्रता परीक्षा ) परीक्षेच आयोजन करण्यात आलंय. सार्वजनिक वाहतूक सेवा एसटी बंद असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. 21 नोव्हेंबरला परीक्षेचं नियोजन राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं करण्यात आलंय.
मुंबई : रविवारी राज्यभरात टीईटी ( शिक्षक पात्रता परीक्षा ) परीक्षेच आयोजन करण्यात आलंय. सार्वजनिक वाहतूक सेवा एसटी बंद असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. 21 नोव्हेंबरला परीक्षेचं नियोजन राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं करण्यात आलंय. आतापर्यंत विविध कारणांमुळे तब्बल तीन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
खासगी वाहतूक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर परवडणारी नाही. त्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.