TET Paper Leak Case | नाशिकमधून 1ला अटक, तर उत्तर महाराष्ट्रातून बड्या लोकांचे नाव येण्याची शक्यता

| Updated on: Jan 07, 2022 | 2:04 PM

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधील गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत चाललीय. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) नाशिक आणि जळगावमधून दोघांना अटक केली आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी दोघांना नाशिक आणि जळगाव मधून अटक केली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधील गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत चाललीय. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) नाशिक आणि जळगावमधून दोघांना अटक केली आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी दोघांना नाशिक आणि जळगाव मधून अटक केली आहे. नाशिक येथून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि चाळीसगाव येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या दोघांनी मिळून 350 परीक्षार्थींकडून तीन कोटी 85 लाख रुपये घेऊन ते एजंटमार्फत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात समोर आलीय.

पुणे सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षा गैरप्रकार प्रकरणी सुरंजित गुलाब पाटील (वय 50, रा. नाशिक) आणि स्वप्नील तीरसिंग पाटील (रा. जळगाव) यांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी दोघांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर यापूर्वी अटकेत असलेले सुनील खंडू घोलप (वय 48, रा. भोसरी) आणि मनोज शिवाजी डोंगरे (वय 45 रा. लातूर) यांना 11 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. टीईटी परीक्षा प्रकरणी 13 आरोपींना अटक करण्यात आली असून चार कोटी 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 7 January 2022
Nagpur | उपमुख्यमंत्री ‘दादां’चा ठाकरे सरकारला विसर पडला?, राज्याच्या परिपत्रकात उल्लेखच नाही